कोनसरी केंद्र शाळेत तिसऱ्या शिक्षण परिषदेचे भव्य आयोजन

552


लोकवृत्त न्यूज
कोनसरी :- जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, कोनसरी येथे आज तिसऱ्या शिक्षण परिषदेचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माधुरी पोतराजे, शिक्षण विस्तार अधिकारी, प. स. चामोर्शी यांनी भूषविले तर उद्घाटन चांगदेव सोरते, गटसमन्वयक-१, प. स. चामोर्शी यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साईनाथ बडगे, मुख्याध्यापक कोनसरी, शंकर मंडल (रामकृष्णपूर),संतोष उत्तरवार (मुख्याध्यापक), लालदेव कोडापे (मुख्याध्यापक कढोली) तसेच रीता चव्हाण (विशेष शिक्षिका, चामोर्शी) उपस्थित होते.
परिषदेतील मान्यवरांनी शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी शिक्षक, पालक आणि समाज यांचा सक्रीय सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक साधनांचा वापर करून सर्वांगीण विकास घडविण्याचे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या प्रांगणात झालेल्या या परिषदेने शैक्षणिक वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले. संचलन स्विटी शिदे, आभार संतोष उत्तरवार, कार्यक्रमाचे आयोजक वेणुगोपाल दासरवार केंद्र प्रमुख कोनसरी यांनी केले.

नवोदय सराव शिष्यवृत्ती सराव
हनुमंत देवतडे नवोदय गणित सराव, चंदु रामटेके विनोबाअँप, अनिश बंडावार मुल्यवर्धन कार्यक्रम माहिती वेणुगोपाल दासरवार केंद्र प्रमुख
उल्लास अँप कु. स्विटी शिदे मॅडम, निपुन महाराष्ट्र अंतर्गत अध्यन स्तर
माहिती, चांगदेव सोरते शाळा स्तरावरील विविध समिती माहिती रविंद्र नल्लुरवार.