चामोर्शीत ५ ऑक्टोबरला तेली समाज वधू-वर परिचय मेळावा

223

– मोफत नोंदणीची सुवर्णसंधी; युवक-युवतींना जीवनसाथी निवडीसाठी उत्तम व्यासपीठ

लोकवृत्त न्यूज
चामोर्शी, दि. २९ : तेली समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी मदत व्हावी या हेतूने निशुल्क वधू-वर परिचय व नोंदणी मेळावा रविवार, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:३० वाजता श्री संताजी भवन, चामोर्शी (जि. गडचिरोली) येथे आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात शहर व गावगाड्यातील शिक्षित व उच्चशिक्षित युवक-युवतींच्या स्थळांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे पालकांना एका दिवसात जास्तीत जास्त स्थळांचा परिचय होऊन वेळ, खर्च व श्रमांची बचत होणार आहे.
मेळाव्याचे आयोजन द्वारकाप्रसाद सातपुते बहुउद्देशीय संस्था, आरमोरी यांच्या सौजन्याने करण्यात आले असून Wadhuwar Parichay OPC Pvt. Ltd. व तेली समाज बांधव यांचे सहकार्य लाभले आहे.
नोंदणीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत. संपर्क : 8698690871, 9421854868, 8208274671 संकेतस्थळ : rashtriyatelisamaj.com
Teli Samaj Wadhuwar Matrimony App (Google Play Store वर उपलब्ध)
समाजातील सर्व बांधव, माता-भगिनींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

#वधूवर #वधू_वर #लग्नं #जीवनसाथी #जोडीदार #लोकवृत्त