गडचिरोली उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे तात्पुरते स्थलांतर

217

– प्रशासनिक कामकाज आता एलआयसीजवळ

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, : - उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गडचिरोली यांचे कार्यालय सध्या सुरू असलेल्या नवीन इमारत बांधकामामुळे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आले आहे. यापूर्वी एस.टी. डेपो समोर, धानोरा रोड येथे कार्यरत असलेले हे कार्यालय आता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, गडचिरोली (एलआयसी कार्यालयाजवळ) येथे हलविण्यात आले असून, सध्या तेथूनच सर्व प्रशासकीय व कार्यालयीन कामकाज सुरू आहे.
नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत हे कार्यालय तात्पुरत्या ठिकाणीच कार्यरत राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी पुढील सर्व प्रशासकीय, न्यायालयीन व कार्यालयीन कामकाजासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, गडचिरोली (एलआयसी कार्यालयाजवळ) येथेच संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी एम. अरूण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या स्थलांतरामुळे नागरिकांच्या कामकाजात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा तात्पुरत्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.