Home गडचिरोली कनेरी जिल्हा परिषद शाळेत नोटबुक वाटपाचा उपक्रम उत्साहात संपन्न

कनेरी जिल्हा परिषद शाळेत नोटबुक वाटपाचा उपक्रम उत्साहात संपन्न

439

कनेरी जिल्हा परिषद शाळेत नोटबुक वाटपाचा उपक्रम उत्साहात संपन्न

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली. दि. ७ जुलै २०२५ :– कनेरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना नोटबुक वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले असून, त्यामुळे शाळेच्या परिसरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये हरबाजी मोरे, देवेंद्र ब्राम्हणवाडे, राजाराम गुकरे, कविता उराडे, शालिनी पेंदाम, शरपारील ब्राम्हणवाडे, गिरीधर मांदाडे, घनश्याम तरारे, प्रशांत कुमरे आणि भावण कावळे यांचा सहभाग होता.
शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाचे योगदान दिले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सकारात्मक भर घालणारा हा उपक्रम पालक व ग्रामस्थांकडून कौतुकास पात्र ठरला आहे.

Don`t copy text!