पहाटेची कारवाई : कुंडलवाडीत अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.३० लाखांचा मुद्देमाल ताब्यात

217

पहाटेची कारवाई : कुंडलवाडीत अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.३० लाखांचा मुद्देमाल ताब्यात

लोकवृत्त न्यूज
प्रतिनीधी साहेबराव कोंडावार कुंडलवाडी : धर्माबाद रोडवरील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवावर पहाटे धडक कारवाई करत सुमारे २५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ५ मार्च रोजी पहाटे ३.४५ वाजता पेट्रोलिंगदरम्यान करण्यात आली.
पोलिसांनी हायवा क्र. MH-26-BE-1772 थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये रॉयल्टीविना लाल वाळूची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. शासनाचा कर बुडवून विना परवाना वाळूची वाहतूक केल्याप्रकरणी चालक सदाशिव गोरठेकर (रा. सायाळ, ता. भोकर) व वाहन मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी गु.र.नं. २४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई सपोनि ज्ञानेश्वर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रघुवीरसिंह चौहाण, सुनील दस्तके, पिराजी मेडेवार व होमगार्ड सुनील रामपुरे यांनी केली.