ट्रकने आजी नातूस चिरडले, अपघातात दोनजण जागीच ठार

1155

 

लोकवृत्त न्यूज
सावली १८ ऑक्टोबर:- चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावली येथील महात्मा फुले चौका समोर चंद्रपूर वरून गडचिरोलीकडे जाणाऱ्या ट्रक क्रं एम एच ४९ ११२७ ने एम एच ३४ बि के ०१५४ ला धडक
धडकेत दुचाकीस्वार आजी व नातु जागिच ठार
दादाजी पा किनेकार उपसरपंच ग्रा प साखरी यांचे लहान मुलगा व आई हे जागीच ठार मुलगा बबलु उर्फ देवानंद दादाची किनेकार वय २८ वर्षे व लक्ष्मीबाई आनंदराव किनेकार वय ७८ वर्षे
घटनेची माहिती मिळताच सावली पोलिस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सावली येथे पाठविण्यात आले आहे. त्यांच्या अचानक झालेल्या अपघातामुळे  किनेकार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.
याप्रकरणी ट्रक चालक जावेद महंमद याला वाहनासह पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सावली पोलीस करीत आहे.