कायदेविषयक जनजागृती व दिवाळी निमित्त साहित्य वाटप मेळावा

319

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 5 नोव्हेंबर: आज दिनांक 30/10/2022 रोजी पोलीस मदत केंद्र, कोटमी येथे मा. पोलीस अधिक्षक नीलोतप्ल सर, मा.अप्पर पोलीस अधीक्षक तारे सर, तसेच मा. उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली “कायदेविषयक जनजागृती मेळावा व दिवाळी निमित्त साहित्य वाटप मेळावा” आयोजीत करण्यात आला होता. सर्व प्रथम महापुरुषांच्या प्रतिमचे पुजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कायदे विषयक जन जागृती मध्ये पेसा कायदा व पोक्सो कायदा, sc-st act, महीला व बाल संरक्षण अधिनियम, भारतीय दंड संहिता मधील महत्वाचे कलम, व नरबळी (ज्यादूटोणा) प्रतिबंध कायदयावर गोंडी भाषेत मार्गदर्शन केले. वन विभाग यांनी वन कायदा यावर मार्गदर्शन केले.उपस्थीत नागरिकांना महत्वाच्या कायद्याच्या पुस्तकाच्या प्रिंट काढून वाटप करण्यात आले

मेळाव्यामध्ये खालील प्रमाणे साहित्य वाटप करण्यात आले.
महिलांना 160 साड्या, व पुरुषांना 90 चटई वाटप करण्यात आले.

पोलीस दादालोरा खिडकी योजनेअंतर्गत विविध योजनाविषयी नागरिकांना माहिती देऊन 5 बँक पासबुक, 3 निराधार योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आले. तसेच 10 श्रम कार्ड, 7 बँक पासबुक वाटप करण्यात आले आहेत.

मेळाव्यासाठी कोटमी हद्दीतील 200 ते 250 नागरिक हजर होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नागनु नरोटे (गाव पाटील कोईदुल) तसेच प्रमुख पाहुणे सीआरपीएफ चे असिस्टंट कमांडंट हरेकृष्न साहेब विशेष प्रमुख पाहुणे (स्वराज्यसेतु फाउंडेशन सोलापुर), रेंजर ऑफीसर एस पी मांडवकर पोमकें चे प्रभारी अधिकारी कदम, पोउपनि महेश गरड, पोउपनि जंगले,उपस्थित होते.

पोमकेच्या वतीने सर्व नागरिकांकरीता जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.