लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 5 मार्च :- अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे मागील काही वर्षांपासून चामोर्शी ते आष्टी मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. अशातच याच मार्गावरील सोनापूर गावासमोर ट्रेलरने एका दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीचालक जागीच ठार तर दुसरा किरकोळ जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. सुरेश महादेव दूधबावरे (55) रा. सोनापूर, असे मृतकाचे नाव असून लुकेश रामभाऊ दुधबावरे, असे किरकोळ जखमी झालेल्या व्यक्ती नाव आहे.
दुचाकी क्रमांक mh 33 z 6877 चामोर्शि वरुन आपल्या स्वगावी सोनापूर जात होते आष्टी कडे जाणाऱ्या मागून येत असलेल्या CG 07 BG 5597 या क्रमांकाच्या मालवाहतूक ट्रकने दुचाकी ला जबरदस्त दिली यात सुरेश महादेव दूधबावरे हे जागीच ठार झाले व लुकेश रामभाऊ दुधबावरे, हे किरकोळ जखमी आहे या अपघातामुळे ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केल्याने येथील वातावरण गंभीर बनले होते.
सोलापूर गावात शोक काळा पसरली आहेपुढील तपास चामोर्शी पोलीस करत आहे













