लोकवृत्त न्यूज
सावली दि २३ ऑगस्ट :- सावली तालुक्यातील चीचबोडी ग्रामपंचायत चे सरपंच सतीश नंदगिरवार या नी गावाला विकसित करण्यासाठी चंग बांधलेला असून मनरेगा योजना अंतर्गत येथील गोरखनाथ मंदिर व स्मशानभूमी परिसरात दोन हजार वृक्ष लागवड करीत असून सदर वृक्ष चंद्रपूर येथील रोप वाटिकेतील आणलेली असून यात आंबा फणस जांभूळ जाम कवट कडूनिंब चिंच इत्यादी प्रकारच्या जातीचे वृक्ष लावली जात आहे.
येथील सरपंच सतीश नंदगिरवार यांच्या संकल्पनेतून पुढे गावाला हिरवट निर्माण व्हावी गावात पुढील काळात आक्सिजन ची कमतरता पडू नये आणि वृक्षतोडीच्या समस्या लक्षात घेत सावली तालुक्यातील एकमेव अशी चीचबोडी ग्रामपंचायत असून.दोन हजार वृक्ष लागवडीचे काम जलद गतीने सुरू आहे सदर वृक्षलागवड करण्याचा संकल्प सरपंच यांनी केल्या नंतर त्याना ग्रामपंचायत सचिव सुभाष डाहारे. उपसरपंच प्रतिक पेंदाम.श्यामराव बाबनवाडे, गिरिधर काठवले, प्रतिभा सहारे, प्रदीप कोरडे,नंदा बाबनवाडे, डोमाजी शेंडे,निखिल चापले, प्रदीप कोरडे आणि ग्रामस्थांनी पूर्ण सहकार्य करून गावाला तालुक्यात नंबर वन अशी ओळख देण्याकरिता सरपंचानी विविध विकास कामाची गंगा गावात आणली असून सध्या चीच बोडी गाव सावली तालुक्यात विकास कामात अग्रेसर असल्याचे बोलले जात आहे.
तसेच या ग्रामपंचायत ने मा. सा. कन्नमवार मॉडल ग्राम योजनेत सहभाग झालेली असून सध्या या ग्रामपंचायत अंतर्गत गावात विविध कामे सुरू आहेत










