“यू-टर्नने” घेतले तिघांचे प्राण : चामोर्शी हादरले

1042

चामोर्शी : आष्टी-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर

लोकवृत्त न्यूज
चामोर्शि  दि. १८ मे :- रोजी दुपारच्या सुमारास घडलेल्या एका भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. चामोर्शी ग्रामीण रुग्णालयासमोर अचानक घेतलेल्या यू-टर्नने तीन कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
मृतांमध्ये विनोद पुंजाराम काटवे (४५), राजू सदाशिव नैताम (४५) आणि सुनील वैरागडे (५५) यांचा समावेश आहे. तर अनिल मारोती सातपुते (५०, रा. चामोर्शी) हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही मंडळी कामानिमित्त कारने आष्टीकडे जात असताना चामोर्शी ग्रामीण रुग्णालयासमोर चालकाने अचानक यू-टर्न घेतला. त्या क्षणी मागून भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहू ट्रकने कारला जबर धडक दिली. धडकेचा परिणाम इतका भयावह होता की, कारचा अक्षरशः चुराडा झाला आणि तिघांचे प्राण घटनास्थळीच गेले.
हा अपघात केवळ एका चालकाच्या चुकीचा परिणाम नसून, महामार्गावरील रचना, अपुरी वाहतूक नियंत्रण व्यवस्था आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचाही गंभीर परिपाक आहे.
चामोर्शी पोलीस तपास करत असून, ट्रक चालक ताब्यात आहे की फरार, यासंदर्भात अधिकृत माहिती प्रतीक्षेत आहे.
हा अपघात महामार्ग सुरक्षेच्या पोकळ दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असून, ‘यू-टर्न’चा निर्णय किती घातक ठरू शकतो, याचे हे जिवंत उदाहरण आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #Chandrapur Police #accident)