माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते मुडझा येथील नव्या वाचनालयाचे उद्घाटन

63

माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते मुडझा येथील नव्या वाचनालयाचे उद्घाटन

लोकवृत्त न्यूज
मुडझा :- मुडझा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या वाचनालयाचे उद्घाटन माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. सुमारे १५ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या वाचनालयाचे भूमिपूजन डॉ. होळी आमदार असताना त्यांच्या विकास निधीतून करण्यात आले होते. आज त्या संकल्पनेला मूर्त स्वरूप मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
उद्घाटनप्रसंगी कृऊबा संचालक हेमंत बोरकुटे, सरपंच शशिकांत कोवे, ग्रामपंचायत सदस्य रामदास सुरपाम, राकेश लोणारकर, ग्रामपंचायत अधिकारी मुरलीधर मेश्राम, तसेच प्रमोद उमरगुंडावार, किशोर सोनूले, सतीश कोवे, धनराज रेचणकर, इशांत बोरकुटे, शुभम गडपायले, आदित्य चौधरी, गौरव चौधरी, अनिरुद्ध मुनगंटीवार, जगदीश लोणबले, भूपेश कोवे, सूरज, भास्कर निकेसर, गंगाधर निकेसर, अमित चौधरी, चंदा चौधरी, ममता सोनूले, दीक्षा जेंगठे, प्राची दाणे, पुरुषोत्तम मेश्राम, सारिका मोगरे यांच्यासह विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. देवराव होळी यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या बळावर उच्च शिक्षण घेत संविधानाची निर्मिती केली, असे सांगत त्यांनी महात्मा फुले व छत्रपती शाहू महाराज यांनी गरीब व वंचितांच्या शिक्षणासाठी उचललेली पावले समाजासाठी दिशादर्शक ठरली असल्याचे नमूद केले. आजच्या पिढीने या महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात ग्रामपंचायत मुडझातर्फे माजी आमदार डॉ. देवराव होळी व कृऊबा संचालक हेमंत बोरकुटे यांचा संविधानाची उद्देशिका देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले.
या वाचनालयामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असून शैक्षणिक प्रगतीला चालना मिळेल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.