Home Breaking News पत्नीच्या त्रासाचा आरोप करत तरुणाची आत्महत्या ; विहिरीत आढळला मृतदेह

पत्नीच्या त्रासाचा आरोप करत तरुणाची आत्महत्या ; विहिरीत आढळला मृतदेह

615

पत्नीच्या त्रासाचा आरोप करत तरुणाची आत्महत्या ; विहिरीत आढळला मृतदेह

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : पोर्ला येथील तुलतुली प्रकल्प कॉलनी परिसरात एका ३८ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुंडलिक रमेश डहलकर असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ८ ते ८.३० वाजताच्या दरम्यान पुंडलिक डहलकर हे कोणालाही काहीही न सांगता नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडले. मात्र बराच वेळ उलटूनही ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला.
दरम्यान, त्यांच्या खोलीत मोबाईलजवळ एक चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीत त्यांनी पत्नी सोनाली डहलकर व तिच्या कुटुंबीयांच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला असून, आई-वडिलांचा कोणताही दोष नसल्याचे नमूद केले आहे.
यानंतर शोध घेत असता पोर्ला येथील तुलतुली प्रकल्प कॉलनीतील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. विहिरीच्या पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी फिर्यादी रमेश लहानुजी डहलकर (वय ६२) यांच्या तोंडी फिर्यादीवरून गडचिरोली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सुरुवातीला बेपत्ता प्रकरण दाखल करण्यात आले होते. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालावरून आकस्मिक मृत्यू (मार्ग) म्हणून नोंद घेऊन पुढील तपास सुरू आहे.

Don`t copy text!