Home Breaking News गडचिरोली : रानटी डुकरामुळे भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार, एक गंभीर जखमी

गडचिरोली : रानटी डुकरामुळे भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार, एक गंभीर जखमी

1724

गडचिरोली : रानटी डुकरामुळे भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार, एक गंभीर जखमी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली,दि.२७ :- गडचिरोली–चांदाळा मार्गावर अचानक रानटी डुक्कर दुचाकीसमोर आल्याने झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना बुधवारी (दि. २७ मे) सायंकाळच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली येथून चांदाळा येथे दुचाकीने दोघेजण जात असताना अचानक रस्त्यावर रानटी डुक्कर आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. अपघातात नागसेन साखरे (वय ४०, रा. शिवणी (वैरागड), ता. आरमोरी, जि. गडचिरोली) यांचा मृत्यू झाला.
तर राजेश जगन्नाथ रोहनकर (वय ४०, फुले वॉर्ड, गडचिरोली) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नागसेन साखरे यांना मृत घोषित केले.
दरम्यान, गडचिरोली–चांदाळा मार्ग जंगल परिसरातून जात असल्याने या भागात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे वाहनचालकांनी विशेषतः रात्री व सायंकाळच्या वेळी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे.

Don`t copy text!