Home Breaking News चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

27

• लग्न पत्रिका देण्यासाठी जाताना काळाचा घाला

लोकवृत्त न्यूज
ता. प्र / धानोरा, :- गडचिरोली जिल्ह्यात अपघातांची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नसतानाच रांगी येथे गुरुवारी (दि. २८ मे २०२६) आणखी एक भीषण अपघात घडला. भरधाव चारचाकी वाहनाच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे १०.३० वाजताच्या दरम्यान MH-33-AB-1039 क्रमांकाची दुचाकी धानोरा येथून रांगीकडे येत होती. त्याचवेळी रांगीहून धानोरा दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी ‘डंग्गा’ वाहनाने लिसिट हायस्कूलजवळील धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या दुचाकीला जबरदस्त धडक दिली.
या भीषण अपघातात नंदू चमरशींग तुलावी (रा. खेडेगाव, मुरूमगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
मृत नंदू तुलावी हे आपल्या बहिणीच्या घरी कोरेगाव (रांगी) येथे लग्नाची पत्रिका देण्यासाठी जात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र वाटेतच काळाने घाला घातल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सदर चारचाकी वाहन धानोरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
Don`t copy text!