Home Breaking News वाघाच्या हल्लात गुराखी ठार

वाघाच्या हल्लात गुराखी ठार

673

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. 22 सप्टेंबर: जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या जेप्रा येथील गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार झाल्याची घटना आज 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास उघडकीस आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नामदेव गेडाम (अंदाजे वय 60 ) असे मृतकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, नेहमीप्रमाणे गुराखी नामदेव गेडाम हे गुरे चारण्यास गेले होते. यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला यात ते जागीच ठार झाले.

वन विभागाच्या वतीने वारंवार मनाई करण्यात आल्यानंतर सुध्दा मुद्दाम दुर्लक्ष करून जंगलात गेल्यामुळे या व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले आहे. झालेल्या घटनेची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा आणि वन विभागाची यंत्रणा घटनास्थळी पोहचलेली होती. घटनास्थळ पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वन विभागाच्या वतीने या नरभक्ष वाघाला जेरबंद करण्यासाठी, आवश्यक प्रयत्न होत असेल काय याबाबत आता शंकाच निर्माण झालेली असून, वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी लोकांनी केलेली आहे.

Don`t copy text!