आज़ादी का अमृत महोत्सव पोलिस अधीक्षक कार्यालय व प्लॅटिनम ज्युबिली स्कूल तथा ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हॅप्पी स्ट्रीट’ कार्यक्रम उत्साहात साजरा

0
458

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, १६ ऑगस्ट :- आजादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२२ रोजी पोलिस अधिक्षक कार्यालय, गडचिरोली व प्लॅटिनम ज्युबिली स्कूल तथा ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हॅप्पी स्ट्रीट’ या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस मुख्यालय येथील शहीद पांडू आलाम हॉल मध्ये करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलिस अधिक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधिक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक अनुज तारे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा, पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम, पोलिस निरीक्षक विशाल जयस्वाल, महासचिव, प्लॅटिनम ज्युबिली एज्युकेशन सोसायटी अझिझ नाथानी, प्राचार्य रहिम अमलानी आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम राष्ट्रगीताने या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये गडचिरोली येथील लहान-थोर जवळपास ३००० शहरवासियांनी उपस्थिती लावली व त्यातील अनेकांनी कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आपले कौशल्य उपस्थितांना दाखविले. देशभक्तीपर संकल्पनेतून नृत्य, संगीत, गीतगायन, कविता वाचन, मार्शल आर्ट, इत्यादी बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आले. उपस्थित मान्यवर तसेच प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात उत्तम प्रतिसाद देऊन कलाकारांची प्रशंसा केली. गडचिरोली जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच होत असल्याची तसेचअसे कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात यावे अशी प्रतिक्रिया सर्वांनी व्यक्त केली.
निरनिराळ्या क्षेत्रात उच्चकोटीचे कार्य करणाऱ्या व उज्ज्वल यश मिळविणाऱ्या तसेच आपल्या कर्तबगारीने जिल्हयास नावलौकिक मिळवून देणाऱ्या गडचिरोली कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.

निवृत्त धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, भंडारा श्रीमती अंजुताई सोनटक्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, प्लॅटिनम ज्युबिली स्कूलची राष्ट्रपती पुरस्कार विजेता विद्यार्थिनी कु. एंजेल देवकुळे, मिसेस युनिवर्स साऊथ पॅसिफिक ऍड. कविता मोहरकर, मिसेस इंडिया २०२१ श्रीमती मनीषा मडावी हे मान्यवर या कार्यक्रमाला सत्कारमूर्ती म्हणून लाभले.

‘हॅप्पी स्ट्रीट’ हा कार्यक्रम हॉटेल वैभव ते शिवाजी महाविद्यालय असा धानोरा रोडवर प्रस्तावित होता. पावसाचा रौद्र रूप बघता सदर कार्यक्रम होणार कि नाही अशी पुसटशी भीती मनात आली होती. पण प्लॅटिनम ज्युबिली स्कूलच्या संचालक मंडळाने कार्यक्रम स्थळ बदलण्याचा अचूक वेळेवर निर्णय घेतला व संपुर्ण कर्मचारीवृंदाने अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करून दाखविल्याबद्दल पोलिस अधिक्षक गडचिरोली अंकित गोयल यांनी शाळेवर स्तुतिसुमने उधळली.यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या कलाकारांना उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा, संचालक अमिरअली नाथानी, संचालक निझार, श्रीमती नंदिनी गड्डमवार, श्रीमती तेजस्विनी देशमुख यांचे हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले व त्यानंतर कार्यक्रमाचे समापन वंदेमातरम या राष्ट्रगानाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पोलिस अधिक्षक कार्यालय, गडचिरोली व प्लॅटिनम ज्युबिली स्कूल तथा ज्युनियर कॉलेजचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here