लोकवृत्त न्यूज
राजुरा २ एप्रिल:- विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार विदर्भातील शेतकरी संघटनेचे नेते तथा वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सातत्याने लढा देणारे वामनराव चटप यांनी आज रविवार दि 2 एप्रिल सकाळी 10 वाजता राजेंद्र पचारे यांचे राजुरा निवास्थानी आपल्या असंख्य कार्यकत्यासह भेट दिली वयोमानानुसार राजेंद्र पचारे हे दि 31 मार्चला शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले शासकीय सेवेत असतांना पचरे यांनी सर्वांशी आपुलकीचे जिव्हाळ्याचे व प्रेमाचे संबध ठेवले होते
दरम्यान सेवानिवृत्त निमित्त आज रविवार सकाळी राजेंद्र पचारे व त्याच्या अर्धगिनी ज्योती पचारे यांचा माजी आमदार वामनराव च टप यांनी सत्कार करून त्याना भविष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या वेळी शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

