सिंदेवाही-मुल महामार्गावर टाटा एस व ट्रॅक्टरची भीषण धडक – १८ जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक
लोकवृत्त न्यूज
सिंदेवाही, दि.८:- रविवारच्या रात्री सिंदेवाही-मुल महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तब्बल १८ जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. विसर्जन मिरवणूक पाहून परतत असताना टाटा एस व ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत घटनास्थळावर एकच गोंधळ उडाला.
जखमींना तात्काळ सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातानंतर जबाबदारी कोणाची यावर ग्रामस्थांमध्ये चर्चा रंगली असली तरी पोलिस तपासानंतरच खरी कारणमीमांसा स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सामाजिक संघटनांनी महामार्गावर वेगमर्यादा काटेकोरपणे पाळावी, वाहनचालकांनी दक्षता घ्यावी आणि विशेषतः रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
घटनेचा पुढील तपास सिंदेवाही पोलिसांकडून सुरू आहे.
#गणपती #चंद्रपूर #विदर्भ #मानववनसंघर्ष #मराठीबातमी #लोकवृत्त #अपघात #महामार्ग
@lokvruttnews @LOKVRUTTNEWS @lokvrutt.com #gadchirolinews @Chandrapurnews #accident #Maharashtra

