गडचिरोलीत शिवसेना कडून छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात

249

गडचिरोलीत शिवसेना कडून छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शुक्रवार, दि. ६ मार्च २०२६ रोजी मराठी तिथीनुसार जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी ५.३० ते रात्री १० वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या निमित्ताने शहरात भव्य-दिव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, आदिवासी नृत्य सादरीकरण, बेंजोच्या मधुर सुरांसह रथ, घोडे आणि विविध कलाकारांच्या देखाव्यांनी मिरवणूक आकर्षणाचे केंद्र ठरली. मिरवणूक शांत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. यानंतर स्थानिक इंदिरा गांधी चौक येथे भव्य स्टेज कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाला संपूर्ण जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन गडचिरोली विधानसभा संघटक नंदुभाऊ कुमरे आणि युवासेना जिल्हा प्रमुख पवन गेडाम यांनी केले.
यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय श्रृगारपवार, उपजिल्हा प्रमुख सुनील पोरेड्डीवार, ज्येष्ठ शिवसेना नेते विलास ठोंबरे, डॉ. बनसोड, चामोर्शी तालुका प्रमुख मनोज पोरटे, दिगंबर मेश्राम, वडसा तालुका प्रमुख विलास ठाकरे, गडचिरोली शहर प्रमुख पप्पू शेख, तालुका प्रमुख कुणाल कोवे, युवा विधानसभा संघटक बादल मडावी, युवा तालुका प्रमुख (शहर) चेतन उरकुडे, युवा तालुका प्रमुख (ग्रामीण) अमित नंदा, युवा तालुका प्रमुख चामोर्शी भूषण पोरटे, युवा शहर प्रमुख वैभव सातपुते, उपतालुका प्रमुख अतुल नैताम, सहारे मॅडम, विक्की शेख तसेच वासुदेव शेडमाके यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने शिवसैनिक व शिवभक्त उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आणि जयंती महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.