Home Breaking News लोहखनिज वाहतुकीमध्ये असलेल्या ट्रकची दुचाकीला धडक : एक ठार, एक जखमी

लोहखनिज वाहतुकीमध्ये असलेल्या ट्रकची दुचाकीला धडक : एक ठार, एक जखमी

885

लोहखनिज वाहतुकीमध्ये असलेल्या ट्रकची दुचाकीला धडक : एक ठार, एक जखमी

लोकवृत्त न्यूज
अहेरी दि.14 :- आष्टी–अहेरी मुख्य मार्गावर लोहखनिज वाहतुकीमध्ये असलेल्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र जखमी झाल्याची घटना शनिवार 14 मार्च रोजी सकाळी 10 वाजता घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चामोर्शी येथील अतुल रामदास बुरे (वय 35) हे आपल्या मित्रासह दुचाकी क्रमांक MH-33 AJ 9952 ने चामोर्शीहून अहेरीकडे जात होते. दरम्यान, आष्टी–अहेरी मुख्य मार्गावरील लगाम येथे लोहखनिज वाहतूक करणाऱ्या MH-34 CQ 2329 क्रमांकाच्या ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोघेही रस्त्यावर पडले. यावेळी ट्रकचे चाक अतुल बुरे यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात दुचाकीवरील दुसरा युवक वैभव अरुण आत्राम (वय 27, रा. कॅम्प एरिया, गडचिरोली) हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी अहेरी पोलिसांनी ट्रक चालक टिकेश्वर गुलाब वानखेडे (वय 58, रा. बंगाली कॅम्प, चंद्रपूर) विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 चे कलम 281, 106(1), 125(a), 125(b) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि देवेंद्र पटले, पोलीस स्टेशन अहेरी करीत आहेत.

Don`t copy text!