• ‘दिशा मॉडेल स्कूल’ म्हणून गौरव
लोकवृत्त न्यूज
गोंदिया :- भोंडेकर शिक्षण संस्था, भंडारा संचालित स्व. जमुनाबाई निवासी मतिमंद शाळा, उमरी (नवेगावबांध) या शाळेची शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये दिशा अभियान, नागपूर विभागामधून ‘दिशा मॉडेल स्कूल’ म्हणून निवड करण्यात आली आहे. हा सन्मान शाळेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
दि. २३ मार्च २०२६ रोजी जिल्हा परिषद गोंदिया येथील मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगनाथन एम. तसेच दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी फरेंद्र कुतीरकर व सहाय्यक सल्लागार वैशाली तायडे यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक एन. पी. बावनकर आणि कला शिक्षक सी. डी. लांजेवार यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी दिशा अभियान नागपूर विभागाचे समन्वयक अभय रोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी शाळेच्या कार्याची प्रशंसा करत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले.
या गौरवामुळे शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, मुख्याध्यापक एन. पी. बावनकर यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.











